शेतकऱ्यांना ३६००० कोटींची कर्जमाफी! mantralay

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आज कॅबिनेटमध्ये होणार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार कोटींची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे २ लाख होणार माफ, पण...

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३० जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. आजच्या (मंगळवारी) मंत्रिमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'चा अंतिम निर्णय होणार आहे. राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्जदार सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३० जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. आजच्या (मंगळवारी) मंत्रिमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'चा अंतिम निर्णय होणार आहे. राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्जदार सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यात दररोज सरासरी सात आत्महत्या होतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. सहकार विभागाने राज्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकारी बॅंका, खासगी व ग्रामीण बॅंकांकडील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारला सादर केली आहे. कर्जमाफीचे निकषही पूर्वीप्रमाणेच असतील. आता ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी थकबाकीतील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

कॅबिनेटमध्ये होईल कर्जमाफीचा निर्णय

महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची ग्वाही दिली होती, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान व थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल. ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय होईल.

- दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री

शेतकरी कर्जमाफीची आकडेवारी

  • एकूण जिल्हे

  • ३६

  • लाभार्थी शेतकरी

  • ५६ लाख

  • कर्जमाफीची अंदाजे रक्कम

  • ३६,००० कोटी

  • थकबाकीदारांना कर्जमाफी

  • प्रत्येकी २ लाख

  • नियमित कर्जदारांना लाभ

  • प्रत्येकी ५० हजार

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांचे काय?

दोन लाख रुपयांची कर्जमाफी राज्य सरकार देणार आहे, पण दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांनी उर्वरित थकबाकी एकदम भरल्यावरच ते दोन लाख मिळणार आहेत का, एकूण थकबाकीचे हप्ते पाडून मिळणार आहे का म्हणजे त्या रकमेचे पुनर्गठन होणार आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे शासन निर्णयातून मिळणार आहेत. दोन लाखांवरील रकमेचे पुनर्गठन झाल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीचा लाभ होईल, अन्यथा दोन लाखांवरील कर्ज भरायला पैसे नसलेल्या शेतकऱ्यांसमोरील अडचणी पुन्हा वाढणार आहेत. याशिवाय त्यांचे सिबिल खराब झाल्यास त्यांना बॅंकांकडून पुन्हा कर्ज देखील मिळणे कठीण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT