zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! उतारवयात द्यावी लागणार ‘या’ शिक्षकांना ‘टीईटी’; परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास घ्यावी लागणार सक्तीची सेवानिवृत्ती; शिक्षण विभागाच्या आदेशानंतर होणार कार्यवाही

प्राथमिक शाळांवरील ५३ वर्षांपर्यंतच्या सर्वच शिक्षकांना दोन वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण करावी, अन्यथा त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करावी, असेही आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह बहुतेक राज्य सरकार पुढे पेच निर्माण झाला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाने १३ फेब्रुवारी २०१३ रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) बंधनकारक केली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकांसाठी देखील ‘टीईटी’चे बंधन घातले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळांवरील ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षे आहे, त्यांना दोन वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे.

प्राथमिक शाळांवरील ५३ वर्षांपर्यंतच्या सर्वच शिक्षकांना दोन वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण करावी, अन्यथा त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करावी, असेही आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह बहुतेक राज्य सरकार पुढे पेच निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने शासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे.

दुसरीकडे शिक्षकांमध्ये संभ्रम असून वयाची पन्नाशी पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नातवंडासोबत ‘टीईटी’ची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी अवघ्या दोन संधी देण्यात आल्या आहेत. राज्यात प्राथमिक शाळांची संख्या ६५ हजार ८० तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या २२ हजार ३६० इतकी आहे. या शाळांवर सुमारे पावणेपाच लाख शिक्षक असून त्यातील २०१३ पूर्वीच्या सर्व शिक्षकांना (ज्यांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे असे) देखील ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. परंतु, फेब्रुवारी २०१३ पूर्वीच्या शिक्षक सेवेत येताना त्यांना ही अट व शर्त लागू नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सादर करेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही

सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे. ११० पानांचा तो आदेश असून त्यावर अभ्यास करून शासनाकडून आदेश प्राप्त होतील. त्यानुसार आम्ही कार्यवाही करणार आहोत.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

प्राथमिक शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • ८७,४४०

  • शिक्षकांची एकूण संख्या

  • ४.७९ लाख

  • ‘टीईटी’ द्यावी लागणारे शिक्षक

  • अंदाजे १.४९ लाख

  • ‘टीईटी‘ उत्तीर्णसाठी मुदत

  • २ वर्षे

शिक्षकांची पदोन्नती आता ‘टीईटी’वरच

शिक्षण सेवकांना तीन वर्षानंतर उपशिक्षक म्हणून संधी मिळते. त्यानंतर सहशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि पुढे देखील पदोन्नती मिळतात. पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर ‘टीईटी’ची अट घालण्यात आल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेला ज्युनिअर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे. त्याला शिक्षक व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर त्या नियमावलीसंदर्भात शासनाने धोरण निश्चित करावे, असा पत्रव्यवहार शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission on SIR : निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय! आता संपूर्ण देशभर ‘SIR’ लागू होणार

Pune: पुण्याच्या राजकारणात मोरे घराणं नवा डाव टाकणार! वडिलांसोबत मुलगाही निवडणुकीचं मैदान गाजवणार, सूचक पोस्टनं लक्ष वेधलं

राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा, आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिली गुडन्यूज, व्हिडिओ व्हायरल

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात वाहतुकीची प्रचंड कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक

Eighth Pay Commission: केंद्र आठवा वेतन आयोग कधी लागू करणार? मोठी अपडेट आली समोर, सरकारची योजना काय? वाचा...

SCROLL FOR NEXT