Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात वाहतुकीची प्रचंड कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक

Khambatki Ghat Traffic update : एसटी बस बंद पडल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले ; जवळपास दोन तास ट्राफिक जाम, वाहनचालक हैराण
A massive traffic jam in Khambatki Ghat as hundreds of vehicles line up on the Pune-bound route, causing long delays for commuters.

A massive traffic jam in Khambatki Ghat as hundreds of vehicles line up on the Pune-bound route, causing long delays for commuters.

esakal

Updated on

Heavy Traffic Reported in Khambatki Ghat Area : सातारा-पुणे मार्गावरील वाहतूक खंबाटकी घाटात खोळंबल्याची माहिती समोर आली आहे. या घाटात वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार एसटी महामंडळाची बस मध्येच बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.

या वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक वाहनं ही पुण्यातील असल्याचीही माहिती समोर येत आहे. जवळपास दोन तास ही वाहतूक कोंडी राहिल्याने, वाहनचालक हैराण झाले होते. सणासुदीच्या दिवसांत गावी जाणारे आणि गावावरून पुण्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या मोठ्यासंख्येने यामध्ये दिसून आल्या.

खंबाटकी घाटातील पुण्याच्या बाजूला जाणारी वाहतुक सांयकाळी पाच ते सात वाजेपर्यंत दोन तास खोळंबली . यामुळे परतीच्या प्रवासाकडे निघालेली वाहने व भाऊबीजसाठी बाहेर पडलेले प्रवासी या वाहातुकीत अडकुन पडली आणि त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला .

A massive traffic jam in Khambatki Ghat as hundreds of vehicles line up on the Pune-bound route, causing long delays for commuters.
Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

नवीन बोगद्याचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता येथे वाहतुकीसाठी खुला आहे . परंतु, पुण्याकडे जाणारी एसटी बस या मार्गावर बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही बंद पडलेली बस दुरुस्त करण्यासाठी तब्बल दोन तासाचा वेळ लागला. तोपर्यंत वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले.

A massive traffic jam in Khambatki Ghat as hundreds of vehicles line up on the Pune-bound route, causing long delays for commuters.
Sushant Singh Rajput case : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला ‘CBI’कडून क्लीन चिट, मात्र आता...

भुईज महामार्ग पोलीस स्टेशनचे पोलिसांनी तारेवरती कसरत करून ही एसटी बस कशीबशी दुरुस्त करून घेतली. अखेर ही वाहतूक सायंकाळी सात वाजता सुरळीत झाली .मात्र वाहनांची संख्या पाहता व बोगद्यातून दोन लेनचा रस्ता असल्याने रात्री उशिरापर्यंत ही वाहातूक धिम्या गतीने सुरू राहील असेच चित्र होते .

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com