ujani dam sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

उजनी धरणात सध्या ९५.७० टीएमसी पाणी आहे. सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. शेतीपिकांसाठी दोन-तीन दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून २० मार्चनंतर सलग ८० दिवस डाव्या व उजव्या कालव्यातून, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडले जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणात सध्या ९५.७० टीएमसी पाणी आहे. सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. शेतीपिकांसाठी दोन-तीन दिवसाला पाणी द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून २० मार्चनंतर सलग ८० दिवस डाव्या व उजव्या कालव्यातून, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडले जाणार आहे. पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होणार आहे.

उन्हाळ्यातील शेतीच्या आवर्तनासाठी उजनीतून जवळपास साडेआठ टीएमसी पाणी सोडावे लागते. दुसऱ्या आवर्तनासाठी सात-साडेसात टीएमसी पाणी लागते. तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून चार टीएमसीची (प्रत्येकी दोन टीएमसी) दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. मात्र, भीमा नदीतून मार्चऐवजी एप्रिलअखेर पाणी सोडले जाऊ शकते. दरम्यान, दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये पाणी सोडल्यानंतर मे महिन्यात उजनी धरण हमखास उणे पातळीत जायचे. धरण उणे २० टक्के झाल्यावर दोन्ही कालव्यातून (कॅनॉल) पाणी सोडणे बंद होते.

उन्हाळ्यातील दोन्ही आवर्तने सोडूनही यावर्षी धरणातील साठा प्लसमध्येच असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्र उजनीमुळे ओलिताखाली आले आहे. शेतीसाठी डावा- उजवा कालवा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना आणि बोगद्यातून पाणी सोडले जाते. दरम्यान, सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी झाल्याने यंदा उजनीतून भीमा नदीद्वारे सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागले नाही. त्यामुळे उजनी धरण पावसाळा सुरू होईपर्यंत प्लसमध्येच राहील, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनी धरणाची सद्यःस्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ९५.७० टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ३२ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ५८.९० टक्के

गतवर्षीपेक्षा यंदा ६ टीएमसी पाणी जास्त

मागील वर्षी ६ मार्च ते १५ एप्रिल या काळात शेतीसाठी उजनी धरणातून उन्हाळ्यातील पहिले आवर्तन सोडले होते. विशेष म्हणजे तीव्र उन्हामुळे लगेचच १५ एप्रिलपासून २५ मेपर्यंत सलग दुसरे आवर्तन देखील सोडण्यात आले होते. त्यावेळी उजनीत एकूण ८९.९० टीएमसी पाणी होते. त्यात २६.१५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा उजनीत उपयुक्त साठा ३२ टीएमसी आणि एकूण ९५.७० टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सहा टीएमसी पाणी जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

Pune News : भाजपच्या आणखी दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर; शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

SCROLL FOR NEXT