zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! झेडपी शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात; शाळेची वेळ सकाळी ७ ते ११.४५ वाजेपर्यंत; २५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र, २६ एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी देखील तापमानाचा पारा 38 अंशापर्यंतच होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अख्खा मार्च महिना तापलेला असणार आहे. ३३ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविल्या जातील.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी (ता. २) देखील तापमानाचा पारा ३८ अंशापर्यंतच होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अख्खा मार्च महिना तापलेला असणार आहे. ३३ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविल्या जातील. त्याचा निर्णय दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. त्याअंतर्गत पावणेदोन लाखांवर विद्यार्थी शिकतात. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावी म्हणून काही शिक्षक संघटनांनी मागणी केली आहे. मात्र, अजून त्यावर निर्णय झालेला नाही. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मार्चमधील तीन दिवसांच्या तापमानाचा अंदाज घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मागील तीन दिवसांत तापमानाचा पारा ३६ अंशावरच आहे. दरम्यान, बीड, नाशिक जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात सुरु झाल्या आहेत. अहिल्यानगरमधील शाळा १६ मार्चपासून, साताऱ्यातील शाळा १७ मार्चपासून तर बुलडाण्यातील शाळा २० मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत. तत्पूर्वी, सोलापूर जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी घेतील निर्णय

सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळा पुढील आठवड्यापासून सकाळच्या सत्रात भरविण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी, त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर ठेवला जाईल. तापमानाचा अंदाज घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

२६ एप्रिल रोजी शिष्यवृत्ती परीक्षा

२६ एप्रिल रोजी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी चौथीतील ३२ हजार तर सातवीतील १७ हजारांवर विद्यार्थी आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चौथीचे २१ हजार २०२ तर सातवीतील पाच हजार ४६७ विद्यार्थी आहेत. सकाळच्या सत्रात शाळा सुरु झाल्यानंतर देखील शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घ्यावी लागणार आहे. शिष्यवृत्तीपूर्वी विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा पार पडेल. दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन पेपर (प्रत्येक पेपर १५० गुणांचा) असतात. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बहुपर्यायी असतात. विद्यार्थ्यांना त्यातून एक अचूक पर्याय निवडावा लागतो. परीक्षेत यशस्वी चौथीतील विद्यार्थ्यांना तीन वर्षांपर्यंत दरवर्षी पाच हजार तर सातवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT