Solapur Airport

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर विमानतळ परिसरात पक्ष्यांच्या घिरट्या! भिंतीजवळ अतिक्रमण, गॅरेजवाले जाळतात टायर, चिकन-मटण विक्रेते टाकतात मांसाचे तुकडे, महापालिका अन्‌ ‘DGCA’ करणार ‘हा’ सर्व्हे

श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणीच एकमेव विमानसेवेसाठी अडथळा असल्याचे सुरवातीला वाटले. पण, विमानसेवा सुरू झाल्यानंतर एक एक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. भटकी कुत्री, पक्षी, पतंग उडविणे, टायर जाळलेला धूर असे प्रमुख अडथळे अजूनही आहेत. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून विमानतळाच्या भिंतीपासून दोन मीटर परिसरातील अतिक्रमण हटविले जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणीच एकमेव विमानसेवेसाठी अडथळा असल्याचे सुरवातीला वाटले. पण, विमानसेवा सुरू झाल्यानंतर एक एक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. भटकी कुत्री, पक्षी, पतंग उडविणे, टायर जाळलेला धूर असे प्रमुख अडथळे अजूनही आहेत. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून विमानतळाच्या भिंतीपासून दोन मीटर परिसरातील अतिक्रमण हटविले जाणार आहे. तत्पूर्वी, स्वतंत्र पथकाद्वारे सर्व्हे केला जाणार आहे.

सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबई, बंगळुरू, बेळगाव अशी विमानसेवा सुरू झाली आहे. पण, विमानतळ परिसरातील पतंग, पक्षी, भटक्या कुत्र्यांचा अडथळा ‘जैसे-थे’ आहे. विमानतळ परिसरातील अनधिकृत कत्तलखाने, चिकन-मटण विक्रेते, भिंतीलगत टाकलेले शिळे अन्न, यामुळे पक्ष्यांचा वावर अधिक आहे. याशिवाय परिसरातील गॅरेजवाले टायरमधील तार बाजूला काढण्यासाठी दिवसा टायर जाळतात. त्याचा धूर देखील विमानाच्या लॅण्डिंग व टेकऑपसाठी अडचणीचा ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी धुरामुळे विमानाला काहीवेळ हवेतच घिरट्या घ्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे या सर्व बाबींचा पोलिस, विमानतळ अधिकारी व महापालिकेचे अधिकारी सर्व्हे करतील. त्यानंतर संबंधितांना लिखित सूचनापत्र देणार आहेत. याशिवाय अतिक्रमण देखील हटविले जाणार आहे, जेणेकरून त्यावरून भटकी कुत्री विमानतळात जाणार नाहीत हा हेतू आहे. विमानसेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

स्वतंत्र सर्व्हे करून ठोस उपाययोजना

विमानतळाच्या भिंतीपासून दोन मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम नसावे. विमानतळ हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. भिंतीला चिकटून घरे, स्वच्छतागृहे अनधिकृतपणे बांधल्याचे दिसते. त्यावरून मोकाट कुत्री, मांजर उड्या मारून विमानतळ परिसरात जातात. अनेकजण भिंतीच्या आत कचरा विशेषतः: शिळे अन्न, मांसाचे तुकडे टाकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच बाबींचा स्वतंत्र सर्व्हे केला जाणार आहे, जेणेकरून विमानसेवेला कोणतीही बाधा होणार नाही या हेतू आहे.

- वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त, सोलापूर महापालिका

किड्यांमुळे पक्ष्यांचा वावर; विमानतळ संस्थेमार्फत करणार सर्व्हे

विमानतळ परिसरात वेगवेगळी झाडी, गवत आहे. दिवस असो की रात्र, त्यावर विविध प्रकारचे किडे खूप असतात. त्या किड्यांमुळे विमानतळ परिसरात पक्ष्यांचा वावर अधिक प्रमाणात आहे. आता विमान येण्यापूर्वी फटाके उडविले जातात, जेणेकरून पक्षी परिसरात थांबणार नाहीत हा हेतू आहे. विमानतळ परिसरात पक्ष्यांचा वावर जास्त असू नये, असे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून निविदा काढली जाणार आहे. स्वतंत्र संस्था नेमून त्यासंबंधीचा सर्व्हे केला जाणार असून त्यातून पक्ष्यांचा वावर कसा कमी होईल, याचा उपाय शोधला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात ‘हाय अलर्ट! 'रेल्वे स्थानकावर बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी'; अजनी, इतवारी स्थानकावरील बंदोबस्तात वाढ..

घरात चक्कर येऊन पडला आणि.... डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट, आता कशी आहे गोविंदाची प्रकृती?

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोर्टाचा आदेश, प्रत्यक्ष हजर राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश!

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले; 20 वर्षांत तब्बल 1536% वाढ; पहा पुणे, मुंबई आणि इतर शहरांतील आजचे भाव!

Leopards Died Kolhapur : कोल्हापुरात यापूर्वी दोन घटनांत बिबट्याचा मृत्यू, पण तिसऱ्या घटनेत वाचल्याचे समाधान; रुईकर कॉलनीतील बिबट्याचा कसा झाला होता मृत्यू

SCROLL FOR NEXT