anil bonde e sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळविणारे अनिल बोंडे कोण आहेत?

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी त्यांचा पराभव केला होता.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर आपले उमेदवारांची नावे जाहीर केले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीवर सतत टीका करणारे बोंडे आता संसदेत दिसणार आहे. भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू गोटातील नेते म्हणून ते ओळखले जातात. अनिल बोंडे हे २००९ ते २०१४ मध्ये अपक्ष आमदार होते. या नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (BJP Announced Anil Bonde As Candidate For Rajya Sabha Election, Who He Is ?)

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बोंडे यांनी मोर्शी (जि.अमरावती) मतदारसंघातून विजय मिळविला. अमरावती जिल्ह्यातून ते सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होणारे आमदार ठरले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये अनिल बोंडे हे कृषीमंत्री होते. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी त्यांचा पराभव केला होता.

अमरावतीला ३० वर्षानंतर राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळाल्याचे अनिल बोंडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार या प्रसंगी त्यांनी मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT