BJP Chitra Wagh esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh : चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही; उर्फी प्रकरणावरुन वाघ आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. वाघ यांनी थेट महिला आयोगाला लक्ष्य करीत रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, उर्फी जावेद प्रकरणामध्ये महिला आयोगाने सुमोटे केस चालवणं गरजेचं होतं. परंतु महिला आयोगाने उर्फीला सॉफ्ट कॉर्नर दिल्याचं वाघ म्हणाल्या.

'' मुंबईत महिला उघडीनागडी फिरत असतांना प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत असतांना दुर्लक्ष केलं गेलं.

चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या दुटप्पीपणाचा पुरावाच यावेळी सादर केला. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरवच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं.

या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमाणूस आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याचं आयोगाने नमूद केलं होतं.

मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसं वाटत नाही? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करुन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

Mumbai Local: लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार, प्रवासी सुविधा वाढणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT