sharad pawar and devendra fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : ८३ वर्षाचा योद्धा…! फडणविसांची शरद पवारांच्या वयावरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर टीका

Devendra Fadnavis : फडणवीसांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या वयावरून वक्तव्य केलं आहे. ते निलम गोऱ्हे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते.

रोहित कणसे

Maharashtra Politics Update : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दीक युद्ध सुरू आहे. यादरम्यान फडणवीसांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या वयावरून वक्तव्य केलं आहे. ते निलम गोऱ्हे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारल पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयाने राज्यातील राजकरण ढवळून निघालं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून अजित पवार आणि शरद पवार हे आमने-सामने उभे ठाकल्याचे पाहायला मिळालं. शरद पवारांनी महाराष्ट्र भरात सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्यापासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.

फडणवीस काय म्हणाले...

दरम्यान यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जसे शरद पवारांनी जाहीर केलं तसं अजित पवारांनी देखील जाहीर केलं की तेही सभा घेतील. मुख्यमंत्री आणि मी आम्ही देखील सभा घेत आहोत. लोकशाही आहे कोणाला हवं त्याने सभा घ्यावी.

८३ वर्षाचा योद्धा..

आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांना ( शरद पवार) शंभर वर्ष आयुष्य लाभो. त्यांना हवं तेवढे वर्ष राजकारण करू देत. ८३ वर्ष वयाचा पुन्हा-पुन्हा उल्लेख करून त्यांचे काही कार्यकर्ते सहानूभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, असे फडणीस म्हणाले.

दरम्यान बुधवारी झालेल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा दाखला देत तुम्ही थांबणार आहेत की नाही असा प्रश्न विचारला. यावर काल शरद पवारांनी वयावर प्रश्न विचारणाऱ्या अजित पवारांना प्रत्युत्तर देताना, मी अजुनही कार्यक्षम आहे. मग ८२ काय आणि ९२ काय मला फरक पडत नाही,असं उत्तर दिलं आहे. या राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर शरद पवार गटाकडून ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात अशा स्वरूपाच्या जाहिरात देखील केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT