eknath khadse girish mahajan Sakal
महाराष्ट्र बातम्या

"मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला, अशी खडसेंची अवस्था"

भाजपच्या गिरीश महाजनांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडली तेव्हापासून ते भाजप नेत्यांच्या टिकेचे धनी झाले आहेत. भाजप नेते सापडेल त्या ठिकाणी त्यांची खिल्ली उडवत असतात. त्यादरम्यान राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेसाठी तिकीट दिलं आणि ते निवडून आले पण त्यानंतरही भाजपचे गिरीश महाजन (BJP Girish Mahajan) त्यांच्यावर बोचरी टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. (BJP Girish Mahajan On NCP Eknath Khadse)

"एकनाथ खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली." अशी त्यांची स्थिती झाली आहे अशी बोचरी टीका भाजपचे (BJP) गिरीश महाजन यांनी केली आहे. खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकारचं गेलं अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील विनोदाचा आधार घेत त्यांनी आमदार खडसेंवर टीका केली आहे. दरम्यान हे मी सोशल मीडियावर ऐकलं असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकामध्ये एकनाथ खडसे यांना भाजपने तिकीट न दिल्याने ते नाराज होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण त्यानंतर राष्ट्रवादीने आता त्यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी तिकीट दिलं होतं. त्यामध्ये ते विजयी झाले आणि आमदार झाले. यानंतर त्यांना आता फक्त आमदारकीवरच समाधान मानावे लागणार असल्याची बोचरी टीका भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेवर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला पण त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली की सरकार पडलं त्यामुळे त्यांची मंदिरात गेलं तर प्रसाद संपला आणि बाहेर आसं तर चप्पल चोरीला गेली अशी अवस्था झाली आहे अशी टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT