Bjp keshav upadhye Shivsena Dasara Melawa 2022 Uddhav Thackeray Speech Shivaji Park  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : "... म्हणून शिवसेना फुटली" भाजप सुचवतंय उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी मुद्दे

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

धनश्री ओतारी

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या निमित्त उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेनेचे २ गट पडले असल्याने कुणाचा मेळावा यशस्वी होणार, कुणाकडे किती गर्दी जमणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सणासुदीच्या या राजकीय परिस्थितीत भाजपनं उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला देण्यात आला आहे. (Bjp keshav upadhye Shivsena Dasara Melawa 2022 Uddhav Thackeray Speech Shivaji Park )

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीट्समधून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे, आज शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का? असा खोचक प्रश्न केशव उपाध्येंनी ट्विटमधून विचारला आहे.

इतक्यावरच न थांबता उपाध्येंनी चार ट्विट करत ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना तुम्ही घरात बसून केलेल्या भाषणात लाकुडतोड्याची गोष्ट सांगितली होती. आज कोणती नवी गोष्ट सांगणार? लाकुडतोड्याच्या गोष्टीतला कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण हे सांगणार आहात का? कारण तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

तसेच, वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही केशव उपाध्येंनी टीकास्र सोडलं आहे. ‘तुम्ही सत्तेवर असताना एकही नवा विकास प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. वेदांत – फॉक्सकॉनला ‘वाटाघाटी’च्या हट्टापायी घालवलेत. फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्प स्थगिती देऊन बंद पाडलेत. यामुळे महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकसान कोण भरून देणार याचे उत्तर आज देणार का?’ अशी विचारणा ट्विटमधून केली आहे.

‘तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का?’ असाही सवाल ट्वीट्समध्ये करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT