महाराष्ट्र बातम्या

मुश्रीफांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार आज उघड करणार - सोमय्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेल कंपन्यांच्या माध्यमातून तसेच साखर कारखान्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा निशाणा धरला आहे. मंगळवारी (ता. 27) मुश्रीफ यांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार उघड करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची माया कमावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. त्याआधी सोमय्या यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्यात घोटाळ्या झाल्याचा आरोप करुन त्यासंदर्भातील मुश्रीफ यांच्याविरोधात कागदपत्रे ईडीकडे दिली होती. त्यानंतर त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र सादर केली. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा अर्थिक घोटाळा केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

सोमय्या यांनी सोमवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवारी मी कोल्हापूरला जाणार असून तिथे मुश्रीफ यांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार उघड करणार आहे. त्यानंतर त्यांनी केलेल्या तिन्ही गैरव्यवहाराबाबत तक्रार दाखल करणार आहे.

मंत्र्यांचा आजारी होण्याचा पॅटर्न :

अगोदर मी घोटाळा काढला की मंत्री गायब व्हायचे. अनेकांच्या बाबतीत हे घडले आहे. आता मात्र लगेच दवाखान्यात भरती होतात. घोटाळा बाहेर आला की मंत्र्यांचा आजारी होण्याचा पॅटर्न दिसून येतो. मुश्रीफ यांचा तिसरा गैरव्यवहार उघड केल्यानंतर राज्यातील 12 मंत्री अडचणीत येणार आहे. त्यामुळे हे 12 मंत्री घोटाळा उघड होताच दवाखान्यात दाखल होणार का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.

हल्ला करणारे नेमके कोण होते? :

कोल्हापूरला येण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्यावर घातलेली बंदी उठवली आहे. मुळात अशा बंदीला मी भीक घालत नाही. कारण ही बंदीच बेकायदेशीर होती. माझ्यावर हल्ला होणार होता हे जर राज्य सरकारला माहिती होते तर त्यांनी काय कारवाई केली, हे स्पष्ट करावे. याबाबत मी केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, राज्याच्या गृह विभागाकडून त्यांना कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मग हे हल्ला करणारे नेमके कोण होते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असे सोमय्या म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT