devenra fadvnias vs manoj jarange patil  cdj98
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीसांवर बोलताना..; भाजपच्या मोठ्या नेत्याचा जरांगेंना इशारा

Manoj Jarange Patil| ज्या पद्धतीने मांजर डोळे मिटून दूध पिते, तरी त्याला जग बघतेच. तसेच आपल्यालाही जग बघत आहे, असे प्रत्युत्तर लाड यांनी जरांगेना दिले. मला राजकारणात यायचे नाही, समाजासाठी काम करायचे आहे, असे तुम्ही सतत म्हणता.

Chinmay Jagtap

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे ममोज जरांगे-पाटील यांनी राजकीय भाष्य करू नये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना अभ्यास करूनच बोलावे, असा इशारा भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला लाड यांनी प्रत्युत्तर दिले. जरांगे यांनी आता राजकीय भाषा करणे ही मोठी चूक आहे. लेकरू-लेकरू म्हणत त्यांनी राजकीय ढेकरू द्यायला सुरुवात केली आहे, अशा शब्दात लाड यांनी त्यांच्यावर टीका केली. ज्या माणसाने मराठ्यांना आरक्षण दिले त्यांच्यावर टीका करू नये, हे आरक्षण कोणामुळे गेले हे देखील सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे.

तुमचा राजकीय बोलविता धनी कोण आहे हेही आम्हाला माहिती आहे. ज्या पद्धतीने मांजर डोळे मिटून दूध पिते, तरी त्याला जग बघतेच. तसेच आपल्यालाही जग बघत आहे, असे प्रत्युत्तर लाड यांनी जरांगेना दिले.  मला राजकारणात यायचे नाही, समाजासाठी काम करायचे आहे, असे तुम्ही सतत म्हणता.

पण आम्हालाही आमच्या लेकरांसाठीच काम करायचे आहे. आम्हाला शंभर टक्के सुरक्षित आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी आम्ही सतत तुमच्याबरोबर होतो, मात्र फडणवीसांवर बोलताना त्यांचे कार्य, राज्यासाठीचे त्यांचे योगदान या सर्व गोष्टी लक्षात घ्या, अभ्यास करा आणि नंतर बोला, असेही लाड यांनी जरांगे पाटील यांना सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT