Sudhir Mungantiwar homage to Empress Lata mangeshkar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला : आ.सुधीर मुनगंटीवार

लतादीदींच्या (Lata Mangeshkar) निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची भावना माज़ी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गानसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. (BJP MLA Sudhir Mungantiwar paid homage to Empress Lata Mangeshkar.)

लतादीदीनी गायन क्षेत्रात केलेला संघर्ष अनन्यसाधारण आहे. आपल्या स्वर्गीय स्वरांनी त्यांनी अवघ्या विश्वाला मोहिनी घातली .त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मन सुन्न , निःशब्द झाले. त्यांच्या या दीर्घ गान प्रवासात त्यांचे सूर कधी अंगाई झाले , कधी तरुणाईचा आवाज झाला , अलवार प्रेमाचे प्रतीक झाला , या स्वर्गीय सुरांनी अनेकांचे भावविश्व समृद्ध केले. ये मेरे वतन के लोगो अशी आर्त हाक भारतीयांना देत लतादीदीनी शहीदांच्या बलिदानाची गाथा मांडली. मेरी आवाज ही पहचान है असे म्हणणाऱ्या दीदी त्यांच्या असंख्य गीतातुन आमच्या सदैव स्मरणात राहतील असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT