MNS-BJP Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

भाजप-मनसे युती; 'या' जिल्ह्यात तयार होणार नवं समीकरण

राज्यातील सर्व पक्ष स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी करत आहेत.

सुधीर काकडे

राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले सर्व पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील वेगवेळी राजकीय समीकरणांवर सध्या चर्चेचा विषय आहे. त्यातच आता शिवसेनेने सोडचिठ्ठी दिलेल्या भारतीय जनता पक्षाने मनसे सोबत युती करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार आता मनसे आणि भाजप पालघर जिल्ह्यात युती करणार आहेत.

पालघरमध्ये आगामी काळातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष (BJP MNS Alliance) एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायसमितीच्या पोटनिलडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आता अधिकृत घोषणा करत ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्वावादी विचारसरणीसाठी आक्रमक होण्याची भूमिका स्विकारली. मागच्या दिवसात पक्षामध्ये झेंड्यापासून अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकड़ून करण्याचा प्रयत्न मनसे करु शकते असा अंदाज राजकीय तज्ञांकडून वर्तवला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर, काय होतं पंडित देशमुख हत्याकांड? बाळराजेंवर गंभीर आरोप

Inspirational Story:'जिद्दीच्या जाेरावर पोलिस हवालदार अमृत खेडकर यांनी केली सायकल रॅली यशस्वी'; १५ दिवसांत ४ हजार २५० किलोमीटर अंतर पूर्ण..

'एकटेपणा प्रचंड त्रास देतो' करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, म्हणाला...'जेवणाच्या वेळी कोणी नसल्याची..'

Gautam Gambhir: सितांशू कोटकचा खुलासा: गौतम गंभीरला दोष देणे चुकीचे, खेळपट्टी आणि फलंदाजीही जबाबदार

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला; हे शेअर्स तोट्यात!

SCROLL FOR NEXT