Maharashtra BJP Sakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्रालयावर भाजपाचा धडक मोर्चा; दरेकरांसह प्रमुख नेत्यांची घरपकड

भाजपाचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात यावेळी बाचाबाचीही झाली.

सकाळ डिजिटल टीम

ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर मध्यप्रदेश सरकारनं हे आरक्षण परत मिळवलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनेही त्याच पार्श्वभूमीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठीच महाराष्ट्र भाजपा आक्रमक झाली असून मुंबई कार्यालय ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला आहे. (BJP Maharashtra Protest about OBC Reservation)

या मोर्चाचं नेतृत्व योगेश टिळेकर करत आहेत. चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार असे अनेक प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात बाचाबाचीही झाली.

भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर काही महिला कार्यकर्ते आणि इतर आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपा कार्यालयासमोर या महिला कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT