Poonam Mahajan Slam on Sanjay Raut's Cartoon esakal
महाराष्ट्र बातम्या

नामर्दांसारखे कार्टून..,राऊतांच्या 'त्या' व्यंगचित्रावर पूनम महाजन संतापल्या

या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केलेली; पुनम महाजनांचे राऊतांवर टीकास्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये शब्दयुद्ध सुरू आहे. शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (bjp) उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. त्या व्यंगचित्रावरुन आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचं ट्विट समोर आल्यानंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन (pramod mahajan) यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन (poonam mahajan) यांनी संताप व्यक्त करत संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (Poonam Mahajan Slam on Sanjay Raut's Cartoon)

संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं, मात्र...

संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन शब्दयुद्ध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादामध्ये हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं होतं. त्यानंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT