महाराष्ट्र बातम्या

जागा वाटप फॉर्म्युल्यातच भाजपची सेनेवर मात?

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेना एकत्रितपणे लढणार असल्याच्या घोषणा वारंवार झालेल्या असल्या तरी यात अंतिम शब्द असणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रस्तावित जागावाटपासाठी एक नवाच "फॉर्म्युला' समोर आणल्याची खात्रीलायक माहिती "सकाळ'ला समजली. त्यानुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी 50-50 टक्के म्हणजे सरसकट नव्हे; तर सध्या दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या 185 जागा वगळून उर्वरित जागांचे समसमान वाटप करण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून संबंधित नेत्यांना तशाच सुस्पष्ट सूचना गेलेल्या असल्याची माहिती आहे.

युतीतील जागावाटपाबाबत 50-50 टक्‍क्‍यांचा फॉर्म्युला निश्‍चित झाल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येते. मात्र भाजप नेतृत्वाने यात एक चलाखीचा खेळ खेळण्याची सज्जता ठेवल्याचे कळते. 2014 च्या निकालांनुसार भाजपकडे 122 जागा आहेत; तर शिवसेनेकडे 63 आमदारांचे बळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे म्हणणे असे आहे, की जागावाटपाच्या टेबलावर बसताना सध्या जिंकलेल्या जागा त्याच पक्षांकडे राहणार, हे निश्‍चित करूनच चर्चा सुरू करावी.

म्हणजे 288 पैकी सध्या जिंकलेल्या जागा सोडल्या तर जागा उरतात 103. त्यातही मित्रपक्षांसाठी जास्तीत जास्त दहा जागा सोडण्याची भाजपची मानसिकता आहे. त्यानंतर उरलेल्या 93 जागांसाठीच पन्नास-पन्नास टक्के, या सूत्रानुसार चर्चा व्हावी व अंतिमतः उर्वरितापैकी साधारण 46-46 जागा दोन्ही पक्षांनी लढवाव्यात, असे भाजपचे सूत्र आहे. त्यातही जास्त जागा मिळविलेल्या पक्षाला झुकते माप असावे, अशीही मेख मारून ठेवण्याची तयारी भाजपने केली आहे. तसे झाले नाही तर स्वतंत्र लढण्याचीही संपूर्ण सज्जता करून ठेवलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी नुकतेच नगर वा मुंबई दौऱ्यांत तसे सूचक विधान केले होते. 

शिवसेनेच्या प्रतिसादाची उत्सुकता 

हे भाजपप्रणित सूत्र शिवसेनेने मान्य केले, तर साहजिकच यात सध्या 122 जागा असलेल्या भाजपचा वरचष्मा राहणार हे उघड आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेना नेतृत्वाकडून भाजपच्या नव्या "शब्द-खेळा'ला काय प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ चारशे धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

पैसे मिळाले तर पुन्हा बैलासमोर नाचशील का? क्षणाचाही विचार न करता गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणते- भाई...

SCROLL FOR NEXT