blue-Mormon 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राच्या "राणी'चे सासवड परिसरात दर्शन 

सकाळवृत्तसेवा

खळद -  महाराष्ट्रचे "राज्य फुलपाखरू' म्हणून घोषित झालेले "ब्लू मॉर्मोन' (Blue Mormon butterfly)अर्थात "राणी पाकोळी' या जातीचे फुलपाखरू सासवड परिसरात पाहावयास मिळाले. प्राणी-पक्षी निरीक्षक व "सकाळ'चे वाचक वसंत कामथे यांनी याबाबत माहिती दिली. 

राणी पाकोळी या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिये पॉलिम्नेस्टर असे आहे. ते महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित झाले आहे. फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू (butterfly) म्हणून ब्लू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी झाल्यावर 22 जून 2015 रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. 

महाराष्ट्रात (Maharashtra) फुलपाखरांच्या जवळपास 225 प्रजाती आहेत. देशातील 15 टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू भारतातील आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतरचे सर्वांत मोठे फुलपाखरू आहे. ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील महाराष्ट्र, दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या विदर्भापासून पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचे अस्तित्व आहे. यावरून पुरंदर तालुका हा जैव विविधतेने परिपूर्ण असल्याचा हा पुरावा मानावा लागेल. 
- वसंत कामथे, प्राणी-पक्षी निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Case : अयानविरोधात पहिल्यांदाच अल्पवयीन पीडिता आली समोर, पोलिसांनी नोंदवला जबाब, नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मी २ महिन्यांची गर्भवती, निदा खानची अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव; तर पोलिसांची ५ पथकं अजूनही घेतायत शोध

Akshaya Tritiya gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं महाग, चांदीही वधारली; वाचा आजचा नवा भाव

'गजवा ए हिंद'च्या नावावर धर्मांतराचा प्रयत्न, दारू अन् सिगारेट पिण्यासाठी बळजबरी, लव्ह बाइट म्हणत तरुणीच्या शरीरावर केल्या जखमा

SCROLL FOR NEXT