SSC-HSC Exam

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

बोर्डाची परीक्षा आता अंतिम टप्प्यात आहे. ज्या विषयांचे पेपर झाले, त्याच्या उत्तरपत्रिका विषय शिक्षकांकडे तपासणीसाठी वितरित झाल्या आहेत. प्रत्येकास २०० ते २५० उत्तरपत्रिका देण्यात आल्या आहेत. त्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी २१ दिवस दिले जातात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बोर्डाची परीक्षा आता अंतिम टप्प्यात आहे. ज्या विषयांचे पेपर झाले, त्याच्या उत्तरपत्रिका विषय शिक्षकांकडे तपासणीसाठी वितरित झाल्या आहेत. प्रत्येकास २०० ते २५० उत्तरपत्रिका देण्यात आल्या आहेत. त्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी २१ दिवस दिले जातात. ज्या शिक्षकांना बोर्डाकडून तपासणीसाठी उत्तरपत्रिका देण्यात आल्या आहेत, त्यांनी त्या घरी घेऊन न जाता शाळेतच तपासणे बंधनकारक असल्याचे बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

सातारा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सहावीतील विद्यार्थी तपासत असल्याची खबर राज्यभर पसरल्याने खळबळ उडाली. पण, ती मुलगी उत्तरपत्रिका तपासत नव्हती तर कोऱ्या पानांवर रेघा मारत होती, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षांपर्यंत आली आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका कोणीही घरी घेऊन जाऊ शकत नाही. सर्व विषय शिक्षकांनी त्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासायच्या असून, घरी जाताना त्या शाळेतच ठेवून त्याची माहिती मुख्याध्यापकांना द्यायची आहे.

एका शिक्षकाला बोर्डाकडून २०० ते २५० उत्तरपत्रिका तपासायला येतात. त्या उत्तरपत्रिका २१ दिवसांत तपासून पुढे मॉडरेटरकडे द्यायच्या आहेत. तेथून बोर्डाकडे एक ते दीड महिन्यात त्या उत्तरपत्रिका येतात. दरम्यान, आता पहिल्यांदा झालेल्या इंग्रजी, मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे जमा व्हायला देखील सुरवात झाली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने सध्या तयारी सुरू झाली आहे.

आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

‘सीबीएसई’ बोर्डाने यंदा इयत्ता बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करून त्या विषय शिक्षकांना थेट त्यांच्या लॉग इनवर पाठविल्या जातील. त्यांना कोठेही बसून त्या ऑनलाइन तपासता येतील. पुढच्या वर्षी दहावी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची अशीच तपासणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळही पुढील काळात यासंदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

पुढील दोन महिन्यात होईल बैठक

उत्तरपत्रिका पडताळणी करण्यासाठी स्कॅन करून विषय शिक्षकांना पाठविण्यावर बोर्डात यापूर्वी चर्चा झाली आहे. अशा प्रकारची तपासणी सध्या मध्य प्रदेशात सुरू आहे. आपलीही आगामी दोन महिन्यात त्यासंदर्भात बैठक होईल. तत्पूर्वी, तो प्रयोग कसा करायचा, एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग मुदतीत शक्य आहे का, त्यासाठी किती खर्च होईल, यावर अभ्यास केला जाईल.

- डॉ. नंदकुमार बेडसे, प्रभारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT