महाराष्ट्र बातम्या

Fire News : खोल समुद्रात बोट पेटली, जीव वाचवण्यासाठी मच्छिमारांनी जे केलं ते वाचून थक्क व्हाल

संतोष कानडे

सिंधुदुर्गः खोल समुद्रामध्ये बोट पेटल्याची घटना आज सिंधुदुर्गमध्ये घडली आहे. बोटीवरील मच्छिमारांनी सतर्कता बाळगून जीव वाचवला अन्यथा अनर्थ झाला असता.

आज दुपारी ही घटना घडली आहे. सिंधुदुर्गमधील देवगड बंदरावरील एक बोट खोल समुद्रात गेली. समुद्रात गेल्यानंतर अचानक या बोटीला आग लागली. क्षणात बोटीने पेट घेतला. जीव वाचवण्यासाठी बोटीवर उपस्थित असलेल्या लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. बोटीवरील मच्छिमारांनी जीवाच्या आकांताने खोल समुद्रात उड्या घेतल्या. या घटनेत कुठलिही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन मच्छिमारांना पायाला इजा झाली आहे.

दोघा मच्छिमारांचे पाय भाजल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. सिंधुदुर्गच्या देवगड बंदरावर यावेळी लोकांची गर्दी झाली होती. खोल समुद्रात घटना घडल्याने नेमकं काय झालंय ते कळत नव्हतं. परंतु सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

Dope Test Before Marriage: नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग सिरीजची रिलीज डेट जाहीर ! विजय वर्मा साकारणार मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT