Temperature 
महाराष्ट्र बातम्या

ब्रह्मपुरी जगात सर्वांत उष्ण

सकाळवृत्तसेवा

नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून, बुधवारी ब्रह्मपुरी येथे जगात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जगातील पहिल्या पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील तीन शहरांचा समावेश आहे, हे उल्लेखनीय. उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.

या महिन्यात प्रथमच चार शहरांचा पारा ४६ अंशांवर गेला. सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे करण्यात आली. येथे नोंद झालेले ४६.५ अंश सेल्सिअस तापमान केवळ देशातच नव्हे, संपूर्ण जगात सर्वाधिक ठरले. ब्रह्मपुरीपाठोपाठ चंद्रपूर येथे ४६.४ आणि नागपूर येथे ४६ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली. जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या ‘एल डोराडो’ या संकेतस्थळानुसार, बुधवारी जगातील पहिल्या पाच ‘हॉट’ शहरांमध्ये विदर्भातील तीन शहरांचा समावेश आहे. ब्रह्मपुरी पहिल्या, चंद्रपूर दुसऱ्या, इजिप्तमधील बहरिया (४६.० अंश सेल्सिअस) शहर तिसऱ्या, मध्य प्रदेशातील खरगोन (४६.० अंश सेल्सिअस) चौथ्या आणि नागपूर पाचव्या स्थानावर राहिले. वर्धा येथेही पारा ४६ अंश सेल्सिअसवर गेला. 

विदर्भात उन्हाची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असून, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT