Uddhav Thackarey 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात सोमवारपासून 'अनलॉक' प्रक्रिया; मध्यरात्री नवे आदेश जारी

सूरज यादव

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध शिथिल कऱण्यावरून बराच गोंधळ झाला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अनलॉक प्रक्रियेची घोषणा केली. पण नंतर युटर्न घेत प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितल्यानं सरकारच्या कारभारावर टीका सुरु झाली होती. अखेर पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सोमवारपासून सुरु होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.

गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार ऑक्सिजन बेड भरलेली संख्या आणि पॉझिटिव्हीटी रेट यांच्या आधारे जिल्हा प्रशासन स्वतंत्र आदेश काढेल. मात्र या दोन निकषांनुसार अनलॉक प्रक्रिया कशी असणार आहे हे राज्य सरकारने सांगितलं आहे. प्रत्येक आठवड्यात दोन निकषांच्या आधारे जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा ते कडक कऱण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांसाठी वेळेचं बंधन नसेल. तर दुसऱ्या टप्प्यात यासाठी 50 टक्केच उपस्थितीची अट असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. तर चौथ्या टप्प्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील आणि इतर दुकाने बंद राहतील. पाचव्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू राहतील. या ठिकाणी वीकेंड लॉकडाउन लागू असेल. जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-नाशिक महामार्गावर सकाळीच भीषण दुर्घटना; ट्रकची समोरासमोर भीषण धडक, वाहतूक खोळंबली

Pune Railway: प्रवास संपला, पण बेडशीट घरी! रेल्वेत प्रवाशांची ‘हातसफाई’; पुणे स्थानकातून तब्बल तीन कोटींचे अंथरुण-पांघरुण, टॉवेल चोरले

No Insurance No Fuel Rule : विमा नाही तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; काय आहे 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ नियम?

Latest Marathi News Live Update : राज्य मानवाधिकार आयोगाकडून पुणे पोलिसांना दणका; अहवाल सादर करण्याचे आदेश

Olympic Dream: ...अन् डी. वाय. दादांची ऑलिंपिकवारी चुकली; खाशाबांसोबतच्या लढतीच्या आठवणीला उजाळा

SCROLL FOR NEXT