anti corruption sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

मयत भावाचे पीएफ, मृत्यू विमा, पेन्शनची रक्कम काढण्यासाठी तक्रारदारने अर्ज केला होता. त्यावेळी साहेबांचे नाव सांगून २५ हजाराची लाच मागणारा खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. सलीम हशरफ शेख (रा. उत्तर सदर बझार, लष्कर) असे त्या संशयिताचे नाव आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मयत भावाचे पीएफ, मृत्यू विमा, पेन्शनची रक्कम काढण्यासाठी तक्रारदारने अर्ज केला होता. त्यावेळी साहेबांचे नाव सांगून २५ हजाराची लाच मागणारा खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. सलीम हशरफ शेख (रा. उत्तर सदर बझार, लष्कर) असे त्या संशयिताचे नाव आहे.

तक्रारदाराचा भाऊ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २०१४ ते २०२३ या काळात शासनाने नेमल्याप्रमाणे पुजारी म्हणून काम करीत होता. २०२३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची पत्नी व भाऊ मयताचा पीएफ, मृत्यू विमा, पेन्शनचे बील काढण्यासाठी कर्मचारी भविष्यनिवार्ह निधी कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी मयताचा भाऊ व पत्नी पाठपुरावा करीत होते. पहिला हप्ता ३८ हजार रुपये मिळाले होते. उर्वरित बील काढण्यासाठी सलीम शेख याने स्वत:साठी व साहेबांसाठी म्हणून २५ हजाराची लाच मागितली. त्यासंदर्भात १३ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेतली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सलीम शेख याने पीएफ कार्यालयाजवळील आस्था हॉस्पिटलच्या बाजूला पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सलीम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रविंद्र लांभाते यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलिस निरीक्षक शैलेश पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT