तात्या लांडगे
सोलापूर : पुणे, पिंपरी चिंचवड भागातील २४ जणांचा विषारी दारूने मृत्यू झाला आणि राज्यभर हातभट्टीचा विषय ऐरणीवर आला. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील ५४ ठिकाणी दररोज लाखो लिटरची गावठी दारू तथा हातभट्टी तयार होते. ती हातभट्टी ३०० हून अधिक गावांमध्ये पोचविली जाते. ग्रामीण पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची सगळी माहिती यापूर्वीच संकलित केली आहे, तरीपण जीवघेण्या हातभट्टीची ना निर्मिती व ना विक्री थांबली.
सोलापूर जिल्ह्यात हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणांची माहिती खुद्द ग्रामीण पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागानेच यापूर्वी संकलित केली आहे. जिल्ह्यात कोणत्या व किती गावांमध्ये हातभट्टीची अवैध विक्री होते, याचीही माहिती यंत्रणेला आहे. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियान सुरु केले.
दरवर्षी दोन्ही यंत्रणांकडून त्याठिकाणी छापेमारी करून सरासरी साडेसात लाख लिटर गुळमिश्रित रसायन व ४० हजार लिटर हातभट्टी नष्ट केली जाते. तरीदेखील, सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टीची नशा उतरलेली नाही. अनेकदा रसायनुक्त दारू नव्या बाटलीत भरून त्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे लेबल, बूच लावल्याचेही कारवाई दरम्यान दिसून आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात ‘येथे’ आहेत हातभट्ट्या
दक्षिण सोलापूर : तिल्लेहाळ, दोड्डी, उळेवाडी, गुरप्पा तांडा, मुळेगाव तांडा, वडजी, शिवापुढारी, सीताराम तांडा, बक्षिहिप्परगा, वरळेगाव
उत्तर सोलापूर : कोंडी परिसर, गुळवंची, तिऱ्हे, सेवालाल नगर, कवठे, भोजप्पा व घोडा तांडा, खेड, शिवाजीनगर
अक्कलकोट : कलकर्जाळ, कोर्सेगाव, तडवळ, मुंढेवाडी, बासलेगाव, नागोर तांडा
पंढरपूर : देगाव, लक्ष्मी टाकळी, वाखरी
करमाळा : सर्पडोह, करमाळा, भाळवणी, जिंती-पारेवाडी, हिंगणी, वांगी, केत्तूर
मोहोळ : बेगमपूर व भांबेवाडी
माळशिरस : कुरभावी, गुरसाळे, धर्मपुरी, चांदापुरी, चंद्रपुरी, विजोरी, चव्हाणवाडी, सवतगव्हाण पारधी वस्ती, पिलीव
सांगोला : पाचेगाव खु., हतीद, वाकीशिवणे, महीम, चिकमहूद, महूद
बार्शी : भातंबरे तांडा
सोलापूर जिल्ह्यातील कारवाई (जप्त मुद्देमाल लिटरमध्ये)
सन हातभट्टी रसायन ताडी
२०२२-२३ ६७,४२३ ६,६२,४४० २१,६६३
२०२३-२४ ६६,८२२ १२,०७,७४९ १२,४५६
२०२४-२५ ४८,३८४ ५,६६,२२० ११,३४९
२०२५-२६ ४४,३९२ ५,६९,७३७ १२,०९०
एकूण २,२७,०२१ ३०,००६,१४६ ५७,५५८
पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील वानखेडे निघाला सोलापूरचा राठोड
पुणे व पिंपरी चिंचवड येथील २४ जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडे (वय २५) या तरुणास अटक केली. तो गुत्तेदारांकडून ३५ लिटर हातभट्टीचे कॅन साधारणतः १९०० रुपयाला विकत घ्यायचा आणि ते कॅन २३०० ते २६०० रुपयाला विकायचा. १५ वर्षांचा असताना तो सोलापुरातून पुण्यात गेला होता. १० वर्षांपासून तो पुण्यातच स्थायिक आहे. त्याचे सोलापुरातील आडनाव राठोड असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या अनुषंगाने चौकशीसाठी पुण्यातील ‘एक्साईज’चे पथक या आठवड्यात सोलापुरात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.