RTE admission solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’अंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांना आता विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ४ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारी (ता. ३१) त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’अंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांना आता विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ४ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांनी शरद गोसावी यांनी शुक्रवारी (ता. ३१) त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना ‘आरटीई’अंतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून तथा त्यांच्या पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सुरवातीला अर्ज करण्याची मुदत १७ ते ३१ मेपर्यंत देण्यात आली होती. आता त्यात पुन्हा चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘आरटीई’अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत नामांकित खासगी इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो आणि त्यांचे शैक्षणिक शुल्क राज्य शासनाकडून भरले जाते.

आतापर्यंत राज्यभरातून साडेतीन लाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले असून त्यातील पावणेदोन लाखांहून अधिक पालकांनी अर्ज कन्फर्म केले आहेत. आता शेवटच्या चार दिवसांच्या मुदतवाढीत राज्यभरातून आणखी ५० ते ६० अर्ज येतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील २९६ शाळांमध्ये दोन हजार ४९६ विद्यार्थ्यांना ‘आरटीई’तून प्रवेश मिळणार असून राज्यातील जवळपास सव्वालाख विद्यार्थ्यांना देखील मोफत प्रवेश मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना अर्जासाठी आता शेवटची मुदत

राज्य शासनाच्या ‘आरटीई’च्या प्रवेशातील बदलानुसार विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळांऐवजी खासगी अनुदानित व जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार होता. त्या बदलानंतरही दोन लाखांहून अधिक पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीनंतर शिक्षण विभागाने पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश काढले आणि १७ मेपासून पालकांना नव्याने अर्ज करण्यास सांगितले. अर्ज करण्याची मुदत ३१ मे रोजी संपली, पण अर्ज करण्यासाठी पालकांना केवळ १४ दिवसांचाच अवधी मिळाल्याने आणखी चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पण, आता मुदतवाढ नसेल असे आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT