उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी Sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! समांतर जलवाहिनीस पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ; उजनी धरणाजवळील शेतकऱ्यांची आडकाठी अन्‌ आत्मदहनाचाही इशारा; पाइपलाइनचे प्रात्यक्षिक आता मेअखेर

उजनी धरण ते सोलापूर-पुणे महामार्ग या अंतरावरील ३०० मीटरचे काम शेतकऱ्याच्या विरोधामुळे थांबलेलेच आहे. त्यामुळे कामासाठी महापालिकेला १५ दिवसांची पुन्हा मुदतवाढ द्यावी लागली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहराचा पाणीपुरवठा नियमित व्हावा, यासाठी २०२१ मध्ये सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीस मंजुरी मिळाली. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून १ जून २०२३ रोजी ६६५ कोटींच्या पाइपलाइनचे काम सुरू झाले. पण, दोनवेळा मुदतवाढ देऊनही उजनी धरण ते सोलापूर-पुणे महामार्ग या अंतरावरील ३०० मीटरचे काम शेतकऱ्याच्या विरोधामुळे थांबलेलेच आहे. त्यामुळे कामासाठी महापालिकेला १५ दिवसांची पुन्हा मुदतवाढ द्यावी लागली आहे. दुसरीकडे धरण उणे १५ टक्क्यांवर पोचल्याने महापालिकेने संभाव्य पाणीटंचाई ध्यानात घेऊन दुबार पंपिंगची तयारी सुरू केली आहे.

सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आणि योजनेअंतर्गत विविध कामांसाठी एक हजार कोटींचा खर्च करण्यात आला. पण, शहराचा पाणीपुरवठा चार-पाच दिवसाआडच राहिला. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेनेची सत्ता राहिली, तरीपण १५ ते २० वर्षांपासून शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळू शकले नाही. सध्या सुरू असलेली समांतर जलवाहिनी झाल्यावर निश्चितपणे आपल्याला दररोज पाणी मिळेल, अशी आशा सोलापूरकरांना आहे. मात्र, ‘अमृत-दोन’ योजनेच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळून त्यातून ८८२ कोटींची कामे होणार नाहीत, तोवर दररोज पाणीपुरवठा शक्य नाही, असे खुद्द महापालिकेचेच अधिकारी सांगत आहेत.

दुसरीकडे पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राला देखील अजून जागा मिळाली नाही. त्यामुळे आता शहरातील लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील तो प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केल्यास निश्चितपणे लवकरच निधी मिळेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या अडथळ्यामुळे काम लांबल्याने आता पाइपलाइनचे प्रात्यक्षिक मेअखेर होईल, असेही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

मेअखेर होईल समांतर जलवाहिनीचे ट्रायल

सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून आता धरण ते सोलापूर-पुणे हायवे या अंतरावरील ३०० मीटरचे काम बाकी आहे. मोडनिंब परिसरातील ४० मीटर काम देखील दोन-चार दिवसात होईल. साधारणतः ५ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका, सोलापूर

शेतकऱ्यांचा विरोध अन्‌ महापालिकेची कसरत

उजनी धरणापासून सोलापूर-पुणे महामार्गापर्यंत काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाइपलाइन आणावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी कामासाठी परवानगी दिली, पण माती काढताना, पाइप घेऊन जाताना १२ मीटर सोडून इतरत्र दोन-पाच फुटावर जरी माती पडली तर शेतकरी विरोध करीत आहेत. एकाने तर बायको, मुलासह आत्मदहनाचाच इशारा दिला. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना ३०० मीटर अंतराचे काम करताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. आता खोदाई ५० फूट राहिली असून पुढील आठवड्यात काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi and Xi Jinping meeting : अखेर मोदी अन् जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला! , ट्रम्प ‘टॅरिफ’वरही होणार चर्चा?

E20 पेट्रोल चुकूनही वापरू नका! 'या' कार कंपनीने ग्राहकांना दिला सल्ला, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Cyber Fraud : व्हॉट्सॲपवरील मैत्री पडली महागात; नाशिकमधील विवाहितेला १६ लाखांचा गंडा

Manoj Jarange News: मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल, आंदोलनावर ठाम, अटींचे पालन करण्याचे पोलिसांना हमीपत्र, म्हणाले...

Asia Cup 2025: संजू सॅमसनची सलग 50+ धावांची खेळी, वाढवली शुभमन गिलसह गौतम गंभीरची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT