संजू सॅमसनने KCL मध्ये सलामीला येऊन सलग तिसऱ्यांदा ५०+ धावांची खेळी केली.
त्याने अदानी त्रिवेंद्रम रॉयल्सविरुद्ध ३७ चेंडूत ६२ धावा (४ चौकार, ५ षटकार) ठोकल्या.
याआधी त्याने १२१ आणि ८९ धावांची खेळी करून फॉर्म सिद्ध केला होता.
Sanju Samson smashes 62 runs in 37 runs with 4 fours & 5 sixes : संजू सॅमसनने आशिया चषक स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पक्की करण्यासाठी केरळ क्रिकेट लीगमध्ये ( KCL) मध्ये फलंदाजीचा क्रम बदलून पाहिला, परंतु त्याला यश हे सलामीवीर म्हणूनच आले. शुभमन गिलचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्यामुळे संजूचे सलामीचे स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे संजूने केरळ क्रिकेट लीगमध्ये फलंदाजीचा क्रम बदलण्याचा प्रयोग केला. पण, त्याने मागील तीन सामन्यात त्याने पुन्हा सलामीला येताना वादळी फटकेबाजी केली. त्याने एक शतक अन् दोन अर्धशतकं झळकावताना आशिया चषक स्पर्धेपूर्वी संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढवली आहे.