Solapur State Excise Department raids illegal liquor manufacturing facility

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये बनावट टॅंगो पंच व भिंगरी दारू बनविणारी फॅक्टरीच आढळली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या गोडावूनवर बुधवारी (ता. २९) छापा टाकला. त्यावेळी गोडावूनमध्ये बनावट दारूसाठी आणलेले स्पिरीट, बॅरेल, बॉक्स, रिकाम्या बाटल्यांचे ढिग, मशिन आढळली. तेथून तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये बनावट टॅंगो पंच व भिंगरी दारू बनविणारी फॅक्टरीच आढळली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या गोडावूनवर बुधवारी (ता. २९) छापा टाकला. त्यावेळी गोडावूनमध्ये बनावट दारूसाठी आणलेले स्पिरीट, बॅरेल, बॉक्स, रिकाम्या बाटल्यांचे ढिग, मशिन आढळली. तेथून तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावरील चिंचोळी येथे जिल्ह्यातील सर्वांत मोठी एमआयडीसी आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी याच एमआयडीसीतून एमडी ड्रग्ज पावडर जप्त केली होती. त्यानंतर आता या एमआयडीसीतील गोडावूनमध्ये चक्क अवैध दारूनिर्मितीचा कारखानाच सापडला आहे. गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सकाळी १० च्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी बाहेरून सिमेंट कंपाउंड असलेल्या मोठ्या गोडावूनमध्ये हा सगळा प्रकार आढळला. त्या गोडावूनबाहेर दारू वाहतुकीसाठीची वाहनेदेखील होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ अदाटे, पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, माझ्या १५ वर्षांच्या पाच जिल्ह्यांतील सेवेत ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.

१० तासांनंतरही सुरूच होती कारवाई

चिंचोळी एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये अवैध दारूनिर्मिती आणि दुसऱ्या दोन गोडावूनमध्ये तेथे बनविलेली दारू ठेवली होती. या गोडावूनमध्ये १४ हजार लिटर स्पिरीट (७० बॅरेल), ४७० बॉक्स दारू, सात वाहने, बॉटलिंगच्या दोन मशिन होत्या. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्याच ठिकाणी होते. गोडावून कोणाचे आहे, अवैध फॅक्टरीचा सूत्रधार कोण, याची माहिती अधिकारी घेत होते. या कारवाईत सातजण निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गोडावूनमध्ये काम करणारे कामगार परराज्यातील, विशेषतः बिहारमधील आहेत.

अवैध दारूनिर्मितीचे मोठे रॅकेट

राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यात एक ट्रक जप्त केला होता. त्यात सव्वाकोटी रुपयांचा गोवा बनावटीचा विदेशी दारूसाठा सापडला होता. या गुन्ह्यातील सूत्रधाराचा चिंचोळी एमआयडीसीतील बनावट दारूनिर्मितीशी संबंध असल्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला संशय आहे. अवैध देशी, विदेशी दारू तयार करण्याचे कौशल्य सोलापुरातील अनेकांनी आत्मसात केले आहे. अनेक ठिकाणी त्यांचे छुपे अवैध उद्योग सुरू आहेत. या अवैध हातभट्टी निर्मितीचा एक सूत्रधार असून, त्याला शोधून काढले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ना पोलिसांना, ना ‘एमआयडीसी’ला माहिती

चिंचोळी एमआयडीसी परिसरात मोहोळ पोलिसांची स्वतंत्र पोलिस चौकी आहे. याशिवाय एमआयडीसीचे मोठे कार्यालय त्याठिकाणी आहे. तरीही एवढ्या मोठ्या गोडावूनमध्ये सुरू असलेली अवैध दारूची फॅक्टरी ना मोहोळ पोलिसांना आढळली, ना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष गेले, हे विशेष. यापूर्वीही एमडी ड्रग्ज याच एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये सापडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

Ganeshotsav Police Guidelines : करमाडमध्ये गणेश मंडळांना पोलिसांचा सल्ला; डीजेचा दणदणाट टाळा, रक्तदानाचा आदर्श घडवा

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

SCROLL FOR NEXT