महाराष्ट्र

प्लॅस्टिकबंदीवर बबल प्लॅस्टिकचा उतारा

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई - प्लॅस्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लॅस्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी घातलेल्या अटी योग्य नसल्याचे सांगत नाराजी व्यक्‍त केली आहे.

राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्यासाठी ‘महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा २००६’ यामध्ये दुरस्ती करून २३ मार्च २०१८ रोजी अधिसूचना काढण्यात आली. यात प्लॅस्टिक आणि थर्माकोल या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक यांच्या नियमनाची तरतूद करण्यात आली होती. या अधिसूचनेतील परिच्छेद ८ नुसार भविष्यात या नियमनांमध्ये आवश्‍यक त्या सुधारणा करणे, त्याची अंमलबजावणी करणे, तसेच त्यातील अडथळे शोधणे, त्रुटींचे निराकरण करणे आदींसाठी एका समितीची स्थापना केली होती. समितीने प्लॅस्टिक उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून नियमनात सुधारणा आणि सवलती देण्यास मान्यता दिली.

यानुसार उत्पादनाच्या ठिकाणी, उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान अनिवार्य वेष्टणासाठी ‘बबल प्लॅस्टिक’चा काही अटी-शर्थींसह वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बबल प्लॅस्टिक पॅकेजिंगसाठी वापरताना ते किमान २० टक्‍के पुनर्प्रक्रिया करून तयार केलेले असावे. ही प्रक्रिया करताना वापरलेले प्लॅस्टिक, त्याचे उत्पादन करतानाचा तपशील, त्याचा प्रकार, पुनर्प्रक्रियेची तारीख याबाबतची माहिती ‘बबल प्लॅस्टिक’वर छापणे बंधनकारक राहणार आहे. 

‘बबल प्लॅस्टिक’ म्हणजे काय?
इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, गॅझेट, संगणक, तसेच शीतपेयाच्या बाटल्या आदींसाठी वापरण्यात येत असलेल्या बुडबुड्यासारख्या प्लॅस्टिकला ‘बबल प्लॅस्टिक’ म्हणतात.

पर्यावरण विभागाने घातलेल्या अटीत उत्पादन करणे जिकिरीचे आहे. कारण कचरा वेचक, भंगारवाले हे असंघटित आहेत. त्यामुळे बबल प्लॅस्टिकच्या उत्पादनानंतर वापरात आणल्यानंतर परत कच्च्या स्वरूपात तितकेच प्लॅस्टिक गोळा करणे अशक्‍य आहे.
- संजय शहा, अखिल भारतीय प्लॅस्टिक असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT