Ramdas Athawale sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Athawale : पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची बांधणी करा

राज्याच्या विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघाच्या ७ जागा आणि शिक्षक मतदार संघाच्या ७ जागा आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्याच्या विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघाच्या ७ जागा आणि शिक्षक मतदार संघाच्या ७ जागा आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ मिळून १४ मतदारसंघाच्या बांधणीकडे रिपब्लीकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे.

मुंबईत पदवीधर मतदार नोंदणीकडे लक्ष देऊन १ लाख पदवीधर मतदारांची नोंदणी रिपब्लीकन कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लब मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आघाडीच्या वतीने आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रामदास आठवले बोलत होते.

यावेळी विचार मंचावर ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र जित आठवले, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, आयोजक पदवीधर आणि शिक्षक आघाडीचे अध्यक्ष घनश्याम चिरणकर, राजीव ठक्कर, राजीव शहा, रिपाइं चे नेते सुरेश बारशिंग, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, सुमित वजाले, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाने यापूर्वी कधीही पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या बांधणी बाबत अशी बैठक घेऊन विचार विनिमय केला नाही. याबाबत पहिल्यांदाच पदवीधर मतदार नोंदणीबाबत आणि शिक्षक मतदारसंघा बाबत विचार विनिमय होत आहे.

पदवीधर शिक्षक मतदारसंघ आघाडीचे घनश्याम चिरणकर यांनी याबाबत प्रयत्न करून बैठक आयोजित केल्याचे सांगून, पदवीधर मतदार नोंदणीकडे रिपब्लीकन कार्यकर्त्यानी लक्ष द्यावे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT