Snajay Raut and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Buldana : महाराष्ट्रातले देव संपले का? शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर राऊतांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची आज बुलडाणा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. यावरून आयोजित सभेत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. (Eknath Shinde news in Marathi)

संजय राऊत यांनी भाषणाची सुरुवातच खोक्यांवरून केली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक खोके आल्याचं म्हणत येथे एक फुल दोन हाफ आहेत. अर्थात एक खासदार आणि दोन आमदार बुलडाण्यात आहेत. बुलडाण्यात रेणूका देवीचं मंदीर आहे. महाराष्ट्रातील देवं संपले का असा सवाल उपस्थित करत हे वेडे देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेल्याची टीका केली.

यावेळी राऊत यांनी कारागृहात काढलेल्या १०० दिवसांचा उल्लेख केला. राऊत म्हणाले की, मी कारागृहात जाताना माझ्या खांद्यावर भगवा होता. भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत असेल. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी जन्मठेप भोगण्यासाठी मी तयार असल्याचं राऊत यांनी यांनी म्हटलं. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना रेडे म्हणून संबोधलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT