The buyers milk purchase price is now 25 rupees Success of the Agitation
The buyers milk purchase price is now 25 rupees Success of the Agitation 
महाराष्ट्र

गाईच्या दुधाचा खरेदीदर आता 25 रुपये; आंदोलनाला यश! 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचे ठरविले असल्याची घोषणा दुग्ध व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज (गुरुवार) केली. दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ मिळावी, यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरू केले होते. हे नवे दर 21 जुलैपासून लागू होणार आहेत. 

या प्रश्‍नावर आज (गुरुवार) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत दूध दराचा तिढा सुटला असल्याचेही सायंकाळपासून सांगितले जात होते. अधिवेशन सुरू असल्याने यासंदर्भातील निर्णय सभागृहातच जाहीर झाला. दुध संघांनाही हा दर मान्य झाल्याचे जानकर यांनी सांगितले. 

दूध दरासाठीच्या आंदोलनात सहभागी होत राज्यभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी विविध प्रकारे निदर्शने केली. यात रस्त्यावर दूध ओतून देणे, गाईलाच दुधाचा अभिषेक घालणे, स्वत: दुधाने आंघोळ करणे, मोफत दूधवाटप, दुधाचे टॅंकर फोडणे असे प्रकार घडले. 

'या प्रश्‍नी सरकारने पाच रुपये अनुदानाचा निर्णय जाहीर करावा. माझ्याशी चर्चा न करता निर्णय घेतला तरीही चालेल; पण ठोस आश्‍वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे', असे शेट्टी यांनी काल सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT