cabinet meeting Marathwada chhatrapati sambhajinagar today CM shinde ajit pawar fadnavis political news rak94 
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Nagar Cabinet Meeting: सीईओंच्या दालनात बसणार मुख्यमंत्री ; प्रशासनाने घेतला ताबा

सकाळ डिजिटल टीम

Cabinet Meeting News: मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी (ता. १६) मंत्रिमंडळाची स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने स्मार्ट कार्यालयाचा ताबा घेतला आहे.

सीईओंचे दालन मुख्यमंत्र्यांसाठी देण्यात आले असून, दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी देखील स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण स्मार्ट सिटी कार्यालयाला कार्पोरेट लूक देण्यात आला आहे. कार्यालयातील खुल्या जागेत पॉश सोफे लावण्यात आले आहेत. संपूर्ण कार्यालय वातानुकूलित करण्यात आले आहे.

मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने यापूर्वीच्या मंत्रीमंडळाच्या बैठका विभागीय आयुक्त कार्यालयात घेतल्या जात होत्या, पण यावेळी स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना हे नियोजन करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दालने रिकामे करण्याची सूचना करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांच्या दालनांचा वापर मंत्री व अधिकाऱ्यांसाठी केला जाणार आहे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसाठी सीईओ, उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे दालने वापरली जाणार आहेत. कार्यालयातील खुल्या जागेत एसीची व्यवस्था नसल्याने याठिकाणी एसी लावून सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य हॉलमध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा मोठा फलक लावण्यात आला आहे.

दुभाजक फोडले

स्मार्ट सिटी कार्यालयाकडे येण्यासाठी कॅन्सर हॉस्पिटलसमोर दुभाजक फोडण्यात आले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. या भागात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला असून, जामा मशिदीपासून रस्ता बंद केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT