Case of Hit and Run sakal
महाराष्ट्र बातम्या

Case of Hit and Run : मिहीर शहाला अटक;पळून जाण्यास मदत करणारेही रडारवर

वरळी येथील हिट अँड रनप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याला मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला उद्या (ता.१०) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळी येथील हिट अँड रनप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याला मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला उद्या (ता.१०) न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी मिहीर याच्या अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला.

मिहीरसोबत त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या, घरात आसरा देणाऱ्या आणखी ११ ते १२ कुटुंबीय, मित्रमंडळींनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली; मात्र त्याबाबत माहिती देण्यास चौधरी यांनी नकार दिला. मिहीर यालाच अटक करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. मिहीरने मंगळवारी सकाळी पश्चिम उपनगरातील एका पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली अशी माहितीही पुढे येत आहे; मात्र त्यास पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, अपघात घडला तेव्हा मिहीरसोबत गाडीत हजर असलेला शहा कुटुंबीयांचा वाहनचालक राजऋषी बिदावत याला मंगळवारी शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

अधिक चौकशीसाठी कोठडी

अपघाताआधी व नंतर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत तपास करून पुरावे गोळा करायचे आहेत; मात्र बिदावत नेमकी माहिती देत नाही. तसेच तो पोलिसांची दिशाभूल करतो आहे, असा संशय असून त्याला व मिहीरला समोरासमोर बसवून चौकशी करणे क्रमप्राप्त आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयासमोर केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने बिदावत याला ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

SCROLL FOR NEXT