Students sakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतही आता सीसीटीव्ही कॅमेरे! दिवाळीनंतर प्रत्येक केंद्राची तपासणी; कॅमेरे नसल्यास मान्यता रद्द; परीक्षा कधीपासून, जाणून घ्या...

प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा असावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी परीक्षेचे रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होणार असल्याने परीक्षा कॉपीमुक्त होईल.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा असावाच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. दिवाळीनंतर बोर्डाच्या पथकांकडून राज्यातील सर्वच केंद्रांची तपासणी होणार असून सीसीटीव्ही नसलेल्या केंद्राची विशेषत: नवीन केंद्रांची मान्यता रद्द होणार आहे. त्यामुळे आगामी परीक्षेचे रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होणार असल्याने परीक्षा कॉपीमुक्त होईल, असा विश्वास बोर्डाला आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नांदेड, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळाअंतर्गत राज्यात तीन ते पाच हजार केंद्रे आहेत. बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी मागील वर्षीपासून सरमिसळ पद्धत सुरू केली आहे. पण, ज्या केंद्राच्या एक ते तीन किमी अंतरावर दुसरे परीक्षा केंद्र नाही, त्याठिकाणी ही पद्धत नव्हती.

आता आगामी परीक्षेवेळी सर्वच केंद्रांसाठी ही पद्धत अवलंबली जाणार आहे. दुसरीकडे प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने तेथील प्रत्येक हालचाल बोर्डाच्या अधिकाऱ्यांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण परीक्षा कॉपीमुक्त होईल, असा विश्वासही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऑगस्टअखेर दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होणार आहे.

यंदाची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकावर २३ ऑगस्टपर्यंत हरकती मागविल्या असून त्यानंतर काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल. सध्याच्या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या काळात होणार असून या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत होईल. इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होईल. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ३ ते २० फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.

परीक्षा केंद्रांवरील कॅमेऱ्यांची होईल तपासणी

दहावी-बारावीच्या परीक्षेचे केंद्र असलेल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असायला पाहिजेत. त्यानुसार सर्व केंद्रांना आदेशीत केले असून दिवाळीनंतर प्रत्येक केंद्रांची नेहमीप्रमाणे पडताळणी होईल. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे तेही चालू स्थितीत आहेत का, हे तपासले जाईल.

- औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे विभागीय मंडळ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT