Officials collecting household data using mobile devices as part of India’s first digital census 2026

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

जनगणना सुरु! १५ मेपर्यंत ‘या’ ॲपवरुन स्वत:लाही भरता येणार माहिती; प्रगणकास प्रत्येकाच्या घरी भेट देण्याचे बंधन, वाचा...

पहिल्या टप्प्यात १५ मेपर्यंत स्व-गणना होणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जूनदरम्यान प्रगणकांकडून घरयादी व घरगणना केली जाणार आहे. स्व-गणना म्हणजे नागरिकांनी स्वतःहून जनगणनेची प्रश्नावली ऑनलाइन पोर्टलवर भरायची आहे. नागरिक https://se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन माहिती भरू शकतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने १ मेपासून स्व-गणनेला सुरुवात झाली आहे. भारताच्या १६ व्या व स्वातंत्र्यानंतरच्या ८ व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. ‘एचएलओ’ मोबाईल ॲप आणि ‘सीएमएमएस’ वेबपोर्टलद्वारे होत असलेल्या या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार ६४४ जणांनी या प्रकियेत आतापर्यंत सहभाग घेतला आहे. त्यापैकी ११ हजार ३४७ जणांनी परिपूर्ण माहिती भरली आहे.

पहिल्या टप्प्यात १५ मेपर्यंत स्व-गणना होणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जूनदरम्यान प्रगणकांकडून घरयादी व घरगणना केली जाणार आहे. स्व-गणना म्हणजे नागरिकांनी स्वतःहून जनगणनेची प्रश्नावली ऑनलाइन पोर्टलवर भरायची आहे. नागरिक https://se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन माहिती भरू शकतात. हे पोर्टल इंग्रजी, हिंदीसह १४ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

माहिती सादर केल्यानंतर नागरिकांना एसएमएस व ई-मेलद्वारे युनिक एसई आयडी मिळेल. हा आयडी प्रगणकाला देणे आवश्यक आहे. प्रगणक घरी भेट देताना स्व-गणना झाली आहे का, याची विचारणा करून एसई आयडीच्या आधारे माहितीची पडताळणी करतील. माहिती जुळल्यास ती स्वीकारली जाईल; अन्यथा दुरुस्ती केली जाईल. स्व-गणना न केल्यास प्रगणक नवीन माहिती संकलित करतील.

लोकप्रतिनिधींद्वारे प्रोत्साहन

स्व-गणनेमध्ये लोकप्रतिनिधीनी सहभाग घेतल्याचे व सहभागी होण्याचे आवाहन करणारे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत. त्यामध्ये भाजप आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील, सोलापूर बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्यासह इतर नेत्यांच्या व्हिडिओंचा समावेश आहे. स्व-गणनेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्या त्या तालुक्यातील, भागातील सेलिब्रिटींचे व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केले जात आहेत.

फोनद्वारे विचारु नये, घरी जावेच लागणार

स्व-गणनेची कोणतीही माहिती फोनद्वारे विचारली जात नाही व विचारलीही जाणार नाही. स्व-गणनेत माहिती नागरिकांनी स्वत: भरायची आहे. त्यानंतर प्रगणक आपल्या घरी येऊन या माहितीची खातरजमा जमा करणार आहेत. नागरिकांनी दिलेली माहिती सुरक्षित व गोपनीय राहणार आहे. आधार, पॅन यांसारखे कोणतेही ओळख क्रमांक विचारले जाणार नाहीत, त्यामुळे कोणीही आपला ओळख क्रमांक देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT