Chandrakant Patil on Shivsena MLA Disappointed
Chandrakant Patil on Shivsena MLA Disappointed  sakal media
महाराष्ट्र

'भ्रष्टाचारी सरकार पाडण्यासाठी...', चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे २५ आमदार संपर्कात असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं होतं. त्यानंतर दानवे चुकीचं बोलले नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दुजोरा दिलाय. सरकारमधील शिवसेनेचे (Shivsena) आमदार नाराज आहेत. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आणि भ्रष्टाचारी सरकार पाडण्यासाठी आमदारांना आवाहन करावंच लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारमधील आमदार अस्वस्थ असल्यामुळे आमदारांना पाच कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यामध्ये विकास कामे न होता फक्त बिले काढले जातील. पैसे देऊनही शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. कारण निधीवाटपात असमानता आहे. ते उद्धव ठाकरेंकडे जाऊन खदखद मांडतात. उद्धवजी त्यांना लॉलीपॉप देतात. २५ आमदार नाराज असल्याचं दानवे काही चुकीचं बोलले नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आणि हे भ्रष्टाचारी सरकार पाडण्यासाठी आमदारांना आवाहन करावं लागेल. आम्ही राजू शेट्टींना देखील आवाहन केलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

'सर्वजण एकत्र आले तरीही...'

एमआयएमने महाविकास आघाडीला ऑफर दिली तरी काहीही फरक पडणार नाही. महाविकास आघाडी सरकारबद्दल असंतोष निर्माण होत आहे. ओबीसी, मराठा, धनगर आरक्षणाचा विषय अजूनही प्रलंबित आहे. शेतकरी वीज तोडणी आणि एसटी आंदोलन याबाबत सर्वसामान्यांच्या मनात असंतोष आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत. आमच्या भीतीमुळे सर्वजण एकमेकांचा हात घट्ट धरत आहेत. तरीही अपयश मिळतं. यांच्यामध्ये हळूहळू फाटाफूट होईल. आमचे सहयोगी पक्ष आहे. आम्ही नव्याने राजू शेट्टींनाही आवाहन केलं आहे. आम्ही सर्व सहयोगी मिळून महाविकास आघाडीच्या एकत्र सरकारला टक्कर द्यायला तयार आहोत, असंही पाटील म्हणाले.

काही मंत्र्यांचे आर्थिक गैरव्यवहार पुढे आले आहेत. सोमवारपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अनिल परबांविरोधा रत्नागिरीत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सोमय्या जे बोलतात ते खरं आहे, असंही पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT