Chandrakant Patil Letter to Amit Shah Over Kirit Somaiya attack e sakal
महाराष्ट्र बातम्या

'सोमय्यांच्या हत्येचा प्रयत्न', चंद्रकांत पाटलांचं अमित शाहांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : किरीटी सोमय्यांवर पुणे महापालिकेत हल्ला (Kirit Somaiya Shivsena Attack) झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिले आहे. सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाटलांनी पत्रात केला आहे.

सत्तेचा दुरुपयोग करून बंगाल आणि केरळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी महाराष्ट्रात लक्ष घालावं. केंद्रीय मंत्री नारायण राणे एक वाक्य बोलले तर त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांना अटक करण्यात आली. नितेश राणेंचा हत्या प्रकरणासोबत कथित संबंध असताना त्यांना अटक करण्यात आली. अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या डिजीला विचारणा केली पाहिजे, की असं कसं घडलंय? किरीट सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पोलिसांना देखील धक्काबुक्की झाली. सरकारी कामात व्यत्यय आणला गेला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

किरीट सोमय्या पुणे महापालिकेत निवेदन देण्यासाठी जाणार असल्याची माहिती शिवसैनिकांना होती. त्यामुळे शेकडो शिवसैनिक आधीच महापालिका परिसरात हजर होते. किरीट सोमय्या येताच त्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यानंतर काहींनी घोषणा देखील दिल्या. शिवसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या पायऱ्यांवरून खाली पडले. त्यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या माकडहाडाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, किरीट सोमय्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT