Chandrakant Patil News | Devendra Fadnavis News 
महाराष्ट्र बातम्या

देवेंद्र फडणवीस मिठाई वाटायला दिल्लीला गेलेत; चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

धनश्री ओतारी

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (MLC election) निकालानंतर शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. यासर्व घडामोडींवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत राऊतांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच पक्षात अडचणी निर्माण झाले असल्याचे म्हटलं आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर का आहेत. याचेदेखील स्पष्टीकरण दिले आहे. (Chandrakant Patil News)

काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार का, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आले आहे. (Devendra Fadnavis News)

संजय राऊत यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच त्यांच्या पक्षात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जनता सहन करणार नाही - एकनाथ शिंदे यांचे बंड हे त्याचे उदाहरण आहे. संजय राऊत यांनी नम्रपणे बोलावे. त्यांनी प्रत्येक बाबतीत कठोरपणे बोलण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

आम्ही राज्यातील घडामोडींवर बारकाईने निरीक्षण करत आहोत. त्यामुळे काही बदल होतील असे म्हणणे थोडे अकाली आहे. ही काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. अशी चिंतादेखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच, निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या राष्ट्रीय नेत्यांकडे मिठाई घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत आमच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये मिठाई वाटण्यासाठी गेले आहेत. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीबद्दल चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT