vidhan parishad Election latest update 2022
vidhan parishad Election latest update 2022 
महाराष्ट्र

'शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार नक्की मतदान करतील'

सकाळ डिजिटल टीम

सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नेते, चंद्रकांत पाटलांनी केले तोंडभरून कौतुक

विधानपरिषदेच्या निवडणुकांवरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने प्रत्येकी दोन उमेदवारांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. (vidhan parishad Election latest update 2022)

दरम्यान, या निवडणुकीतही भाजपाने राजकीय खेळी खेळल्याचे चित्र आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला असून अपक्ष म्हणून भाजपाने त्यांचे समर्थन केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सदाभाऊ खोत यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोत यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपचा पाठिंबा आहे. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी भाजप त्याचं समर्थन करणार आहे. त्यामुळे अधिकृत पाच उमेदवार आणि अपक्ष एक असे सहा उमेदवार भाजपचे निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपने पाच अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत. सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांना अपक्ष उभे करून त्यांना पाठिंबा देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार मतदान करतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपाने विधान परिषदेची सहावी जागा लढवणार असल्याचं सांगितल्यानं आणखी चुरस वाढली आहे. सहाव्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे. आज सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी यासंबंधी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती.

भाजपाच्या निरोपामुळे सदाभाऊ खोत मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून ते अपक्ष म्हणून आज उमा खापरे यांच्यासोबत विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत भाजपाकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून संधी मिळणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT