chandrashekhar bawankule sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule : पक्ष विलिनीकरणाशिवाय पवारांकडे पर्याय नाही

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आपला पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणे हा शरद पवार यांचा इतिहास आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराप्रमुख साईनाथ बाबर आदी उपस्थित होते.

प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरणावर करण्यासंदर्भात चर्चा सुरु असून त्यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याने शरद पवार यांना पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. शरद पवार यांनी पुलाचा प्रयोग केला, त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, हा त्यांचा इतिहास आहे. तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत दोन पक्ष संपणार असल्याचे सांगितले आहे, त्यावरून विलीनीकरण होणार हे लक्षात आले असेलच, असा टोलाही बावनकुळे यांनी लावला.

निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डमधून मिळालेले पैसे वाटले जात आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, त्यावर बावनकुळे यांनी टीका करत चव्हाण यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आहे. बॉन्डमधून मिळालेल्या पैशाचा हिशोब प्राप्तीकर विभागाला द्यावा लागतो. निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे उद्यान हे काँग्रेसचेच आहे. बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल करणे, तक्रारी करणे हा विरोधकांचा नियोजित कट होता अशी टीका बावनकुळे यांनी केली.

कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत, याच निर्णयाचे स्वागत आहे. जीवनावश्यक वस्तूंबाबत आचारसंहितेत घेता येतात, त्यामुळे येते आचारसंहिता भंग झालेला नाही. राज ठाकरे हे महायुतीसोबत आल्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दुखावले आहेत. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, पण जनता मोदींसोबत आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT