Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : विपर्यास केला गेला! फडणवीसांच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

रवींद्र देशमुख

मुंबई - Nagpur Floods : नागपूर मध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेलं होतं. अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. या पुरात तीन मृत्यू झाले. यावरून नागपूरमधील लोक आक्रमक झाले होते. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरची पाहणी केली. यावेळचा फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओवरून वाद निर्माण झाला असून यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांच्या व्हायरल ऑडियो क्लिपवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, त्या व्हिडीओचा विपर्यास केला गेला. जनतेमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर आहे. मागच्या दहा वर्षांत जे नागपूर बदललं, ते कधीच बदललं नाही.

ज्यांनी नागपूर करता एक रुपयाचा विकास केला नाही, ते बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या घरी गेले. त्यांच्या घराची तपासणी केली. घरात पाणी घुसल्यावर आक्रोश तर राहणारचं, असंही बावनकुळे यांनी नमूद केलं.

फडणवीस नागपूरमध्ये पुरग्रस्त भागाची पाहणी करत असताना काही स्थानिक लोक आक्रमक झाले होते. त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला होता. यावेळा एका व्यक्तीच्या हाताला धरून फडणवीस आपल्याकडे ओढताना दिसत आहेत. त्यावरून विरोधकांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT