Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

Tata Airbus Project: 'एअरबस' प्रकल्प नाशिकला नेण्यासाठी छगन भूजबळांनी दिलं होतं पत्र

संतोष कानडे

मुंबईः वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता एअरबस टाटा हा प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनी यासंदर्भात एक पत्र पाठवल्याचं सांगितलं आहे.

टाटाचा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्याने सर्व पक्षांकडून टोलवाटोलवी सुरु आहे. आ. छगन भूजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एअरबस प्रोजेक्टचं काम टाटा ग्रुपला मिळाल्यानंतर मी तेव्हा त्यांना पत्र पाठवलं होतं. हा प्रकल्प नाशिकमध्ये व्हावा, अशी मागणी केल्याचं भूजबळांनी सांगितलं.

''एकापाठोपाठ एकेक प्रकल्प गुजरातला जात आहे. ही गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत वजन आहे. त्यांनी असे प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या युवकांनी फक्त दहिहंडी, आरत्या, हनुमान चालिसा, फटाके.. यातच गुंतून रहायचं का? निदान यापुढे तरी फडणवीसांनी प्रयत्न करायला हवेत.'' अशा शब्दांत भूजबळांनी भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, भाजपने ट्विट करत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच 'एअरबस टाटा' गुजरातमध्ये गेला. असा आरोप भाजपने केला आहे. तसेच, भाजपने ट्विटची मालिका शेअर करत या प्रोजेक्टबद्दल खुलासा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT