

VAIBHAV SOORYAVANSHI DREAM LIST
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI DREAM LIST: भारतीय संघाचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी त्याने पाहिलेली स्वप्नं आणि त्याची लिस्ट बघून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये ६ ऑक्टोबरपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.
त्यापूर्वी वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. झालं असं की, वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये तो क्रिकेटमध्ये त्याला काय करायचं आहे, याबद्दल आपली इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे. यामध्ये वैभवला त्याच्या ज्या काही इच्छा आहेत, त्या क्रमाने सांगायला सांगितलं.