solapur city police case

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात मित्रांनीच केला चिकन विक्रेत्या मित्राचा खून! ‘तू मला मारणार होता का’ म्हणत 2 मित्रांच्या मदतीने मन्सूरअलीने उमरवर केले सपासप वार; ३ जणांना ४ दिवसांची कोठडी

सोलापुरातील शांती चौकातील पाण्याच्या टाकीखाली तीन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी समोर आली. उमर मौलाली बिराजदार (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृताने संशयित आरोपींमधील मन्सूरअली नदाफ यास मारतो म्हणून धमकी दिली होती. त्यातूनच तिघांनी मिळून उमरचाच खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. न्यायालयाने तिघांनाही १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील शांती चौक येथील पाण्याच्या टाकीखाली तीन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी समोर आली. उमर मौलाली बिराजदार (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृताने संशयित आरोपींमधील मन्सूरअली नदाफ यास मारतो म्हणून धमकी दिली होती. त्यातूनच तिघांनी मिळून उमरचाच खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. न्यायालयाने तिघांनाही १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

खुनाच्या गुन्ह्यात मन्सूरअली महमद नदाफ (वय २०, रा. सिद्धेश्वर गांधी नगर भाग-५, नई जिंदगी), अविनाश दशरथ चव्हाण (वय २२, रा. बापूजी नगर, मजरेवाडी, नई जिंदगी), आहद इक्बाल सय्यद (वय २२, रा. मजरेवाडी) या नई जिंदगीतील तिघांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकाने काही तासांतच पकडले होते. खून करून तिघेही पळून जाण्याच्या तयारी होते. तिघेही अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरजवळील फूटपाथवर बसले होते. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. त्यांना आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, मृत उमर व संशयित आरोपी एकमेकांचे चांगले मित्र होते; पण काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वर्चस्वावरून वाद झाला होता.

उमरने एकाजवळ मन्सूरला मारतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर कलबुर्गीवरून घरी आलेल्या उमरला तिघांनी बोलावून घेतले. बुधवारी मध्यरात्री चौघेही शांती चौकातील पाण्याच्या टाकीखाली बसले. त्या ठिकाणी जुना वाद उद्‌भवला आणि अविनाश व आहदने उमरला धरले आणि मन्सुरअलीने उमरच्या डोक्यात कोयत्याने चार-पाच वार केले. हातावर, गालावर देखील वार करून उमरचा खून केला. घटनास्थळी मारेकऱ्यांकडील कोयता आढळला नाही; पण उमरच्या दुचाकीजवळ एक कोयता सापडला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

उमरच्या गाडीजवळील कोयता कोणाचा?

आज उमरचा काटा काढायचाच, म्हणून तिघांनी प्लॅन केलेला असावा. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिघेही उमरसोबत शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ बसले. त्या ठिकाणी जुना वाद उकरून काढण्यात आला आणि तिघांनी मिळून उमरचा खून केला. उमरलाही असे काहीतरी आपल्यासोबत होणार याची कुणकूण लागली असावी, त्यामुळे त्याने देखील कोयता सोबत नेला असावा. त्याच्या दुचाकीजवळ रक्त न लागलेला कोयता मिळाला असून तो कोणाचा होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT