cm eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच; दादा भुसेंचा दावा

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार अशा चर्चा सुरू आहे. शिंदे यांचे देखील दिल्ली दौरे झाले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करताना शिंदेच मुख्यमंत्री राहणार, असंही म्हटलं. त्यावर आज शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दादा भुसे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाबाबतचे देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट ऐका. शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. आगामी निवडणूक देखील त्यांच्या नेतृत्वाखाली होतील, असं ते म्हणाले आहे. तसही एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असा दावाही भुसे यांनी केला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत दादा भुसे म्हणाले की, याबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतात. त्याच्या निर्णयाचे आम्ही पालन करतो. शिवाय भुजबळ आणि महाजन यांचे मार्गदर्शन घेतो. पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री यांचा असल्याचही त्यांनी नमूद केलं.

लोकसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले की, निवडणुकांची तयारी प्रत्येक पक्ष करत असतो. पक्ष कुठलाही असो ते त्यांचे काम करत असतो. महायुतीचे मिशन 45 पूर्ण करू, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT