Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री म्हणायचे एकत्रच लढू पण... अजितदादांनी सांगितलं कारण

आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घेण्याची मुभा जिल्हास्तरावर देण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना (Corona)परिस्थितीमुळे जिल्हानिहाय चर्चा करता आली नाही. शेवटी आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घेण्याची मुभा जिल्हास्तरावर देण्यात आली होती. त्यानुसारच निवडणूक (election) लढवण्यात आली असली तरी राज्यस्तरावर महाविकास आघाडी भक्कम असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी बारामतीत दिले.

राज्यातील राजकीय समीकरणांबाबत विचारले असते अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी मला, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण यांना सांगायचे आपण सगळे मिळून सर्वच निवडणूकांना एकत्रित सामोरे जाऊ असे सांगायचे. कोरोनाच्या काळात तसे काही करता आले नाही, जिल्हानिहाय एकत्र चर्चा केल्याने स्थानिक पातळीवरील विरोध कमी होईल, असे मुख्यमंत्री सांगत होते, मात्र नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून आम्हाला एकत्र येता आले नाही. या वर उपाय म्हणून जिल्हा स्तरावरच आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याची मुभा दिली गेली व त्या नुसार निवडणूका लढविल्या गेल्या. राज्यस्तरावर महाविकास आघाडी मजबूत आहे, असे अजित पवार म्हणाले.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटर बेडची गरज तितकी पडत नाही, लोक घरी राहूनच काळजी घेत आहेत, ही दिलासादायक बाब असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्य शासनाने व स्थानिक प्रशासनानेही गरज भासल्यास बेडसही इतरही तयारी करुन ठेवलेली आहे, मात्र कोरोना पॉझिटीव्हिटी वाढत असली तरी तीव्रता कमी आहे त्या मुळे सध्या तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

पीक निघेपर्यंत शेतक-यांचा वीजपुरवठा खंडीत करु नका अशा सूचना अधिवेशनादरम्यान दिल्या होत्या. उर्जामंत्र्यांनीही तसे निर्देश दिलेले होते. पीक निघाल्यानंतर तरी शेतक-यांनी चालू बिलाचे पैसे भरले पाहिजेत, थकीत बिलांच व्याज व दंड माफ केले असून थकीत बिलांना हप्त्याने भरण्याचीही सवलत दिली जात आहे, रब्बीचे पिक बाजारात विकल्याशिवाय शेतक-यांकडेही चार पैसे येणार नाहीत ही बाब विचारात घेऊनच ही सवलत दिली होती. तरीही ज्या ठिकाणी पिके गेलेली नाही अशा ठिकाणी काही मार्ग काढायचा प्रयत्न आघाडी सरकार म्हणून करु, असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT