fadnavis thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

मी मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं नाही, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

ओमकार वाबळे

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा भरत असतो. मात्र यंदा कोरोनानंतर पहिल्यांदा हा सोहळा पार पडला. शण्मुखानंद हॉल या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी "मी अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं," असं वक्तव्य केलं. याला टोला लगावत "मी मुख्यमंत्री आहे असं मला वाटत नाही. मी मुख्यमंत्री आहे असं कोणालाही वाटू नये. मी तुमच्या घरातील एक सदस्य आहे", असे ठाकरे म्हणाले. वाट्टेल ते करायचं, पण मला सत्ता हवी! हे म्हणजे सत्तेचे व्यसन आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मी मुख्यमंत्री आहे असं मला वाटत नाही. मी मुख्यमंत्री आहे असं कोणालाही वाटू नये. मी तुमच्या घरातील एक सदस्य आहे, असं सगळ्यांना वाटावं, असं ठाकरे म्हणाले. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे काही नेते ओरडत असतात. मात्र, त्यांच्या डोक्यात सत्तेचा अहंकार गेला आहे. ज्या क्षणी आमच्या डोक्यात अहंकार जाईल, त्या वेळी सगळं संपेल, असं ठाकरे म्हणाले.

माझं भाषण कधी संपतंय, आणि आम्ही चिरकतो कधी, यासाठी अनेकजण संधी शोधत आहेत, मात्र ही विकृती आजकाल आली आहे. या चिरकणाऱ्यांना तिथल्या तिथे ठेचू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. माझा वाडा चिरेबंद आहे. तुमची डोकी फुटतील, पण तडा जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI : रोहित, विराट यांना शेवटची संधी? जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याची वेळ, ठिकाण अन् Live कुठे पाहाल

Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

Sarfaraz Khan ला टीम इंडियातून वगळल्याने वाद; शमा मोहम्मद यांचे गौतम गंभीरवर मोठे आरोप, म्हणाल्या- तो खान म्हणून...

सगळे केस जळले पण चेहरा वाचला; धकधक गर्ल माधुरीने सांगितला दिवाळीचा भयानक अनुभव "मी अभिनेत्री नसते.."

'नटरंग'नंतर आता येणार 'फुलवरा'; रवी जाधव यांचा आणखी एक तमाशा पट, कोणते कलाकार दिसणार?

SCROLL FOR NEXT