चिंचली मायाक्का मंदिर खुले sakal
महाराष्ट्र बातम्या

कर्नाटक-महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले चिंचली मायाक्का मंदिर खुले

सकाळ वृत्तसेवा

रायबाग : कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मायाक्का चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवीचे मंदिर १९ महिन्यांनी बुधवारी (ता. २२) तहसीलदार रियाज बागवान व मान्यवरांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी झाले. मंदीर खुले झाले तरी भाविकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे लागणार आहेत.

कोरोना संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मंदिर खुले करण्याचे आदेश मंगळवारी (ता. २१) दिले. त्यानुसार आज (ता. २२) मंदिर विविध पूजाविधीनंतर खुले करण्यात आले. कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविक मायाक्का देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यातही महाराष्ट्रातील भाविकांचा भरणा जास्त असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे मंदिर बंद होते. परिणामी भाविकांचा हिरमोड झाला. मार्च महिन्यात होणारी यात्रा दोन वर्षे न झाल्याने कोटवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

बुधवारी (ता. २२) तहसीलदार रियाज बागवान व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. आता मंदिर खुले झाल्याने भाविकांची संख्या वाढणार आहे. मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहेत.

मंदिरे ओपन, सीमाभागातील रस्ते क्लोज

रायबाग तालुक्यातील मायाक्का देवी देवस्थान व कागवाड तालुक्यातील खंडोबा देवस्थान प्रसिद्ध आहे. त्यामुळे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दोन्ही मंदिरे आता खुली झाली आहेत. मात्र कोरोनाबाबत खबरदारी म्हणून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील रस्ते अद्याप बंदच आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या कमीच असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT